Tweet

Wednesday 5 February 2014

Irrigation of agricutural Land:


मराठीत वाचण्याकरिता खाली स्क्रोल करा.

So far it is considered that irrigation of land using dams and canals is the best. Agriculture scientists advise Sprinkler or Drip Irrigation to save water instead of surface irrigation. This is useful where floating solids in water are negligible. Present availability of water for irrigation is much less than rainfall as most of the water flows to sea. In Maharashtra State Konkan region is the best example to understand this. Total rainfall (almost entire rainfall is during June to August) is over 3 metres per annum. However during summer even drinking water is not available to villagers. Reason specified by government departments is, reasonably levelled area is not available for storage of rain water. In most of other parts in India tall dams are constructed for storage of water. However, none of the dams is big enough to store entire rainfall in catchment area. Such dams do force people to immigrate. Almost in every case, the government doesn’t take efforts to rehabilitate these people properly and speedily. Thus there is a reason to undertake research in modifying our irrigation system.

Desired system should reduce immigration to nearly zero, store (either above ground or below ground level) entire requirement of water for over a year, cost should be low and work should be speedy. Thorough investigations and research is needed to find a new system suitable for India. I have some suggestions. Fundamental efforts should be for storing rain water for use during other seasons. Storage facility should be such that it would be economical, practical, avoid losses during storage and requiring almost zero land. Bearing this in mind I suggest the following:-
1.      Dams are needed for storing water. However, storage area needs land and mostly covers forest or residential villages. Hence the height of dam should be as low as possible. There may be need to construct many more dams at regular intervals on the river. This may cost more as far as construction cost is considered. However, it may be found faster and avoiding immigration of people.
2.      Canals for carrying water should be larger than presently constructed. The reason is water flow in canals would be much more during rainy season. This means land saved for storage of water would be needed for carrying water. If need arises special pumping arrangement may be provided to empty water stored in dam.
3.      Canals so constructed must not be lined with concrete or any other material to stop leakage/seepage. Water seepage should be encouraged with exception of water going back to river. Water seepage from canals shall be stored underground for use when rain water is not available for irrigation.
4.      Every village should have above ground/below ground level storage tank to store water needed for village for at least 1 year. This tank also may not be lined to stop seepage. We should take full advantage of storing water underground in a natural way. There are many natural water channels in the form of seasonal rivers, or small streams. These can be used to carry water to areas where rainfall is scanty or insufficient. Kolhapur in Maharashtra state (India) has developed a novel method to store water in a river (or any water channel) and at the same time ensure that the sediments are not accumulated in the river. This is modification over a Weir. A weir is provided with gates which open from bed of the river. When there is adequate water flow the sediments are carried by water.
5.      Water for irrigation must not be given directly from canal. Farmers should have open wells/tube wells which shall be source of water for irrigation or any other use. Considering availability of water, crop pattern and other factors which control method of irrigation such as surface, Sprinkler or drip etc. should be adopted.
6.      The government should encourage farmers to take as much water as available during rainy days and store it below ground level.
7.      Pumping of water would need electricity. However, there are many more advantages like immigration of people is avoided, forest is saved from submerging in water, less construction cost, speedy results and alike.

There is an inescapable need to revise water policy of India. New policy should consider storage of rain water in every village either above ground/below ground level or free storage below ground, economical methods for collecting rain water and carrying it to other places where rain fall is scares, making maximum use of natural resources like seasonal rivers, nalha and all similar water channels, using water in the most economical way.

बागायतीशेतीकरिता पाणीः
पुरातनकाळापासून नदीचे पाणी शेती पिकविण्याकरिता वापरले जाते. नदीला बांध घालून पाणी अडविणे नंतर पाटाने (किंवा मोटेने उपसून) पाणी शेतापर्यंत नेले जात होते. जेथे जवळपास नदी नसेल तेथे भूगर्भातील पाण्याचा वापर होत असे होत आहे. ते पाणी वापरून शेती पिकवणे हे कित्येक दिवसापासून मनुष्याला माहित आहे. परंतु, पाण्याच्या  अति वापरामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहेे. कित्येक ठिकाणी पाणीपातळी इतकी खोल गेली आहे की तेथून पाणी उपसणे जवळ जवळ अशक्य होत चालले आहे. नदीला बांध बांधून पाणी अडवण्याकरिता नंतर कालवे बांधण्याकरिता खूप खर्च होतो. हा पैसा शासन उभा करू शकत नसल्याने नदीचे पाणी शेतीच्या उपयोगात येता समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे पाणी आहे परंतु पुरेसा निधी नसल्याने पाणी शेतीला देता येत नाही. भूगर्भातील पाणीपातळी खोल गेल्यामुळे तेही पाणी मिळत नाही. निधी नाही म्हणून हातावर हात धरून बसणे हे काही चांगले लक्षण नाही. त्यावर उपाय काढलाच पाहिजे.
आतापर्यंत मोठी धरणे बांधून तशी तर आपण चूकच केली. कित्येक लोक विस्थापित केले गेले, जंगले पाण्यात बुडविली, पाण्याच्या अतिवापराने शेती खारवट केली. भूगर्भातील पाण्याच्या अतिउपशामुळे भूगर्भातील पाणी संपवून टाकले. ही चूक सुधारता येण्यासारखी आहे. त्याकरिता फारसा निधी लागणार नाही परंतु, कष्ट संयमाची आवश्यकता आहे. पाणी मिळविणे वापरणे यामध्ये स्वयंशिस्त आवश्यक आहे. पाण्याची किंमत ओळखून त्याप्रमाणे भारतातील प्रत्येकाने योग्य किफायतशीर उपयोग केला पाहिजे. जनमानस तयार असेल तर खालील प्रयत्न पुरेसे पाणी अनंतकालापर्यंत मिळवून देऊ शकतील.
1.             पावसाचे पाणी जमीनीवर साठवण्याकरिता धरणे पाहिजेतच. धरणाची उंची जितकी जास्त तितकी पाणी साठविण्याची मर्यादा जास्त. त्याचबरोबर पाण्याखाली बुडणारे क्षेत्रही जास्त. विस्थापितांची संख्याही जास्त. याकरिता लागणारा निधीही जास्त. यावर उपाय म्हणजे  एकच मोठे धरण बांधण्याऐवजी छोटी छोटी कित्येक धरणे बांधणे. या करिता एकूण खर्च जास्त येईल परंतु जितका जसजसा निधी उपलब्ध होत जाईल तस तशी धरणे बांधली जातील पाण्याची उपलब्धता वाढत जाईल. हे पाणी वापरासाठी कालवे लागतील, पंप लागतील. ते ही निधिच्या उपलब्धतेनुसार पुरवावे लागतील. प्रथम उदाहरण कालव्यांचे घेऊ या. कालवे बंधणे म्हणजे खोदणे, भराव टाकणे, पाणी मुरू नये म्हणून अस्तर लावणे या प्रकारची कामे लागतात. निधी कमी असेल तर फक्त खोदण्याचे काम केले त्या मध्ये पाणी सोडले तर ते थोड्या अंतरातच जमीनीत मुरेल. परंतु जमीनीत मुरले म्हणून वाया गेले असे म्हणता येत नाही. ते भूगर्भत साठविले असा त्याचा अर्थ घ्यावा. म्हणजेच गरजेनुसार ते पाणी उपसून वापरता येईल. उपसावे लागल्यामुले पाण्याचा वापर जेवढे पुरेसे आहे तेवढाच होईल. पावसाळ्यात कालव्यात पाणी सोडले तर ते मुरेल अथवा वाहिल म्हणजेच जमीन पाण्याने भरली की पाणी पुढे वाहिल नविन भागात मुरेल. याचाच अर्थ निधीची कमतरता ही अडकाठी होऊच शकत नाही. जेवढा निधी आहे त्यात होईल तेवढे काम करत जाणे हा मार्ग चोखाळणे हाच उपाय आहे.
2.            सध्या साठवलेले पाणी वाहून नेण्याकरिता  कालवे  बांधले जातात. कालव्याचा सुधारित उपयोग ध्यानात घेतला तर कालव्यांचा उपयोग भूगर्भत पाणी साठविण्याकरता असा होतो. त्यामुले कालव्यांना खर्चिक अस्तर लावण्याची आवश्यकता नाही. नैसर्गिक ओढे, नाले, छोट्या पावसाळी नद्या सुद्धा कालव्यासारख्या वापरता येतील.
3.            प्रत्येक गाव जमीनीखाली तसेत जमीनीवर पाणी साठवू शकते. पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरविणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे.
4.           कोल्हापूर पद्धतीचे बंधारे खूप उपयुक्त आहेत. पावसाळ्यात दारे उघडल्यामुळे पात्रातील गाळ वाहून जाते धरणाचा वरील भाग गाळाने भरून जात नाही. पावसाळ्याच्या शेवटी दारे बंद केल्यावर पाणी साठविले जाते ते नंतर वापरले जाते. या मध्ये थोड्या सुधारणा केल्या तर पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळण्याऐवजी जमीनीत मुरविले जाऊ शकते.
5.            शेतीला धरणाचे पाणी पुरविण्याचे तंत्र बदलले पाहिजे. धरणांचा उपयोग पाणी साठविण्याकरिता, कालव्यांचा उपयोग मुरविण्यात येणारे पाणी वाहून नेण्याकरिता असे. शेतीला पाणी उपसूनच पाजावे.
6.            शासनाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी जमीनीत मुरविण्याकरिता प्रोत्साहन द्यावे.
7.           छोटे बांध घातलेल्या धरणामुळे वीजेचा वापर वाढेल. परंतु, विस्थापितांची संख्या जवळ जवळ शून्य होईल. जंगले वाचतील. उपलब्ध निधीत कामे होतील. पाण्याचा उपयोग होण्यास मोठ्या धरणामुळे 10-20 वर्षे लागतात. हा वेळ निदान काही भागाकरिता 5-6 महिन्यापर्यंत खाली येईल.
भारतामध्ये पाणी साठवण वापर याकरिता नियम बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जेथे पावसाचा थेंब पडेल तेथेच तो मुरावा अशी सोय करावी लागेल. जेथे शक्य आहे तेथे जमीनीवर पाणी साठवावे लागे. पाणी वाहून नेणारे नेसर्गिक स्त्रोत म्हणजेच पावसाळी बारमाही ओढे, नाले, नद्या यांचा पुरेपूर उपयोग करूम घेतला पाहिजे. पाणी जमीतीत मुरले याचा अर्थ ते वाया गेले असा घेऊ नये. सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याचा वापर थेंबात मोजावा एखादा थेंबही जादा वापरू नये.

No comments:

Popular Posts