Tweet

Sunday 29 March 2015

Sanskar Mhanje kay? v adhik.



संस्कार
अमरावतीच्या एका माननियानी ब्राह्मण समाजाचे कोतुक केले आहे. कौतुक करणे तसे चांगले असते. परंतु, त्याचा अर्थ असाही होत नाही की, त्या समाजात फक्त सद्गुणच आहेत. चांगले ते घ्यावे या विचाराप्रमाणे चांगल्या गोष्टी दाखविणे कधीही चांगलेच. तसेच त्याबरोबर विश्लेषण केले तर दुधात साखर. समाजातील गुण-अवगुणांची जननी म्हणजे संस्कार. मुलाच्या (या मध्ये मुलगीही आली) जन्मापासून संस्कार घडविले जातात. त्या मध्ये कांही जाणीवपूर्वक घडवावे लागतात तर कित्येक निरीक्षणातून घडविले जातात. मूल नेहमी अवती भोवती पाहत असते, ऐकत असते व जे पाहिले ऐकले ते स्वतः करून पाहण्याचा प्रयत्न करते. त्यातूनच ते घडले जाते व आपले स्वतःचे व्यक्तिमत्व निर्माण करते. कोणत्याही समाजाचे गुण-अवगुण त्या समाजातील व्यक्तिवरुन ओळखता येतात. व्यक्ति संस्कारातून घडविली जाते. म्हणूनच संस्कार हे महत्वाचे आहेत.

Popular Posts